Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारमी दगडात नाही. मी देवळातही नाही.मी झाडात आहे

मी दगडात नाही. मी देवळातही नाही.मी झाडात आहे

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी –

नंदुरबार शहरात राहणार्‍या एका कलाशिक्षकाने (Art teacher) निसर्गाचा र्‍हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात गणपती साकारत (Ganpati in the tree) त्याची प्रतिष्ठापणा केली.

- Advertisement -

नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे रनाळा येथील धनराज आनंदा पाटील हे सध्या नंदुरबार शहरातील सिताई नगरात वास्तव्यास असून तालुक्यातील पथराई येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते चित्रकारासोबत शिल्पकारही आहे. निसर्गावर भरभरून प्रेम करणार्‍या या अवलियाने वृक्ष संवर्धानासाठी विविध उपक्रम राबविले आहे.

सर्वत्र गणरायाचे आगमन होवून त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध मंडळ, घरगुती गणेशाच्या मुर्ती खरेदी करण्यात आले आहे. यात काही शाडु मातीच्या, काही प्लास्टरऑफ पॅरीसच्या मुत्या आहेत. शिक्षक धनराज पाटील यांनी त्यांच्या शेतात एका झाडाची तुटलेली फांदीपासून तीन वर्षापुर्वी घरात वृक्षाचे शिल्प साकारले.

या शिल्पातच काहीतरी वेगळे करून पर्यावरणाचा संदेश देण्याची त्यांनी ठरविले. त्यानुसार त्यांनी यंदा गणपती मुर्ती न आणता या वृक्षातच एकही रूपयाचा खर्च न करता दिड तासात गणपती साकारला व तेथेच गणरायाची विधीवत स्थापना करत मी दगडात नाही. मी देवळातही नाही.

मी झाडात आहे, झाडे लावा, पाणी वाचवा असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. धनराज पाटील यांनी त्यांच्या होळतर्फे रनाळा गावात वृक्ष लागवडीसाठी लेकीचे झाड, बाऊचे झाड, पुण्यस्मरणार्थ वृक्ष रोपण केले. यात त्यांनी लागवड केलेले 48 पैकी वृक्ष जगले आहे. त्यांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाबाबत सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या