Wednesday, March 26, 2025
Homeनगरइमामपूर येथे अपघातात भेंडा येथील महिलेचा मृत्यू

इमामपूर येथे अपघातात भेंडा येथील महिलेचा मृत्यू

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नगर तालुक्यातील इमामपूर (Imampur) येथे झालेल्या अपघातात (Accident) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील 42 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक (Bhenda) येथील प्रगतशील शेतकरी संभाजी भिमराज मिसाळ हे सोमवार दि.20 मे रोजी पत्नी मनीषा संभाजी मिसाळ (वय 42 वर्षे) हिला घेऊन नगर येथे दवाखान्यात गेले होते.

- Advertisement -

दवाखान्यातील काम आटोपून संभाजी व पत्नी मनीषा हे दुचाकीवरुन भेंडयाकडे येत असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास अ.नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway) इमामपूर गावाच्या कमानीजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धड़क दिल्याने झालेल्या अपघातात मनीषा ही रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून तिचा मृत्यू (Death) झाला. पती संभाजीने तीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तेथे शवविच्छेदन होऊन रात्री उशीरा भेंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मनीषा यांच्या मागे सासू-सासरे, पती, मुलगा, मुलगी, दिर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. ज्येष्ठ नागरिक भिमराज मिसाळ यांच्या त्या सुन, संभाजी मिसाळ यांच्या पत्नी तर शिवाजी मिसाळ व त्रिंबक मिसाळ यांच्या त्या भावजय होत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...