Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रRain Alert : पुढील 5 दिवस धोक्याचे; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rain Alert : पुढील 5 दिवस धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई । Mumbai

राज्यात सध्या पावसाने जोर धरला असतानाच, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांसाठी गंभीर हवामान इशारा (Weather Alert) जारी केला आहे. विशेषतः २८ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवसांत या विभागांत अतिवृष्टीची शक्यता (Heavy Rainfall Warning) वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

YouTube video player

उद्या (२८ सप्टेंबर) परिस्थिती अधिक गंभीर होणार असून, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या सर्व जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट कायम राहणार असल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

२९ सप्टेंबर रोजी या दिवशी पालघर जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटचे दोन दिवस आणि ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या काळात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.

हवामान विभागाने दिलेल्या या गंभीर हवामान इशाऱ्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी मोठी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणांना संभाव्य पूरस्थिती आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, कारण वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनेनुसार वागावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....