Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

राज्यात पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

मुंबई | Mumbai

सध्या राज्यात पावसाने (Rain) विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी असेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तर पुणे हवामान खात्याने पावसाबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे…

- Advertisement -

राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप अशीच सुरु राहिल. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

15 लाख, 30 लाख! लाचखोरांची वाढती भूक!

महाराष्ट्रात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसंच येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडले असेदेखील हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईमध्ये पुढचे ४ ते ५ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही. मुंबईत येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुलांमध्ये वाढता क्रोध धोकादायक

- Advertisment -

ताज्या बातम्या