Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यापशुवैद्यकीय दवाखान्यांंच्या कामकाजाच्या वेळेत सुधारणा

पशुवैद्यकीय दवाखान्यांंच्या कामकाजाच्या वेळेत सुधारणा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील गोवंशीय पशुधनास प्रादुर्भाव झालेल्या विषाणुजन्य लम्पी (Lumpy)चर्मरोगावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पशुवैदयकीय दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.याची अंमलबजावणी रविवार दि.१८ सप्टेंबरपासून करण्यात येणार असून याचा लाभ जिल्ह्यातील पशु पालकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे (Animal Husbandry Officer Dr. Vishnu Garje) यांनी केले आहे.

- Advertisement -

याबाबतचे आदेश डॉ.शितलकुमार सुकणे सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांनी शासन परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

राज्यात उद्भवलेल्या गोवंशीय पशुधनामधील विषाणुजन्य सांसर्गक लम्पी चर्मरोग प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील शेतकरी, पशुपालकांकडील पशुधनास आवश्यक त्या सर्व पशुवैदयकीय सेवा तात्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने राज्यातील पशुधनामधील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणत येईपर्यंत म्हणजेच राज्यात लम्पी चर्मरोगाचा एकही पशुरुग्ण सापडणार नाही, तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून राज्यातील सर्व जिल्हा पशुवैदयकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघु पशु वैदयकीय सर्वचिकित्सालये,श्रेणी-१ व श्रेणी-२ चे सर्व पशुवैदयकीय दवाखाने (राज्यस्तरीय व स्थानिक स्तरीय) आणि फिरत्या पशुवैदयकीय दवाखान्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.सुधारीत वेळ रविवार दि. १८ सप्टेंबरपासून तात्काळ अंमलात येणार आहे.

सोमवार ते रविवार सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. (जेवणाची सुट्टी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत)

पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी-१ व श्रेणी-२ (सर्व)

फिरते सर्व पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी २४ तास पशुवैदयकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

कार्यालयात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी सेवकांच्या सेवा सकाळी कामाच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर व संध्याकाळी अर्धा तास उशीरा जादा राहतील.तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी रोटेशन पध्दतीने पर्यायी व्यवस्था करुन वरील सर्व पशुवैदयकीय संस्था सुरू ठेवून शेतकरी व पशुपालकांकडील पशुधनास आवश्यक त्या पशुवैदयकीय सेवा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन करावे, जेणेकरुन शेतकरी, पशुपालकांकडुन कोणत्याही तक्रारी प्राप्त होणार नाहीत. याची दक्षता घेण्यात यावी,अशा सूचना सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे डॉ. शितलकुमार सुकणे  यांनी शासन परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या