Sunday, May 4, 2025
Homeधुळे‘क्रिमीनल ट्रॅकींग’मध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

‘क्रिमीनल ट्रॅकींग’मध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

धुळे । dhule। प्रतिनिधी

गुन्हेगार हायटेक (Criminal hi-tech) होत आहे. त्यामुळे पोलिसांनाही हायटेक (Hi-tech police too) होणे गरजेचे आहे. गुन्हेगारांचा मागोवा (Track criminals) घेण्यासाठी त्याची कुंडली असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सॉफ्टवेअर (software) तयार करण्यात आले असून येत्या पंधरा दिवसात ते कार्यान्वित केले जाईल. क्रिमीनल ट्रॅकींगचे (criminal tracking) हे सॉफ्टवेअर गुन्हेगार शोधण्यासाठी क्राईम डिटेक्शन रेट (Crime detection rate) वाढण्यासाठी मदतीचे ठरेल, असे नाशिक परिक्षेत्राचे आयजी बी.जी.शेखर पाटील (Nashik area IG BG Shekhar Patil) यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

- Advertisement -

कचरा ठेकेदार वॉटरग्रेस प्रॉडक्टसला दंड

धुळे जिल्ह्यातील गुन्हेगाराचा आढावा आज आयजी पाटील यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पुढे बोलतांना श्री. पाटील म्हणाले की, धुळे जिल्ह्यात गुन्हेगारांचा डिटेेक्शन रेट चांगला आहे पण तो आणखी वाढला पाहिजे. गुन्हेगार डिटेक्ट होत असतानाच कन्व्हीक्शन रेट म्हणजेच आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण देखील वाढले पाहिजे. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी लवकरच कार्यशाळा घेतली जाईल.

सोनगीरनजीक लाखाची देशी दारु जप्त120 ग्रामपंचायतीसाठी 2362 उमेदवार रिंगणात

या कार्यशाळेत न्यायाधिशांचे मार्गदर्शन घेतले जाईल. गुन्ह्यांच्या अनेक प्रकरणांमध्ये साक्षीदार, फिर्यादी फितूर होण्याचे प्रमाण जास्त असले तरी तशा केसेसचा देखील आढावा घेतला जाईल. क्राईम डिटेक्शन आणि कन्व्हेक्शनमध्ये धुळ्याची स्थिती चांगली असली तरी ती आणखी चांगली व्हावी ही अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यालगत गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सिमा असून त्या राज्यांच्या पोलिस यंत्रणेशी समन्वय चांगल्या प्रकारे आहे.

न्यायालयाचा अवमान : तत्कालीन पोलीस अधीक्षकांंसह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना नोटीसबालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षाVISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज

गुजरात मधून राज्यात आश्रय घेणार्‍या 26 फरार आरोपींना पकडून दिले.त्यांच्याकडूनही आपल्याकडचे आरोपी पकडले जातात. नवापूर येथील पोलिस कोठडीतून फरार झालेल्या आरोपींच्या कारणांचा शोध घेतला जाईल. दोष नेमका कोणाचा आहे. त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. असे श्री. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत होती. ती रोखण्यामध्य मोठे यश आले आहे.महाराष्ट्राचा पंजाब होवू नये यासाठी ड्रोन लावून कारवाई करण्यात येत आहे असे आयजी पाटील यांनी सांगितले.

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

म्हसरूळच्या सीतासरोवरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

0
    पंचवटी | प्रतिनिधी Panchavati म्हसरूळ परिसरातील सीतासरोवरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि...