धुळे । dhule। प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत (12th exam) यंदाही जिल्ह्यात (district) मुलींनीच बाजी (girls won) मारली आहे. जिल्ह्याचा 92.29 टक्के इतका निकाल लागला आहे. शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक 95.70 टक्के तर धुळे तालुक्याचा सर्वात कमी 89.95 टक्के इतका निकाल लागला आहे.
धुळे जिल्ह्यातून बारावीचे नियमित 23 हजार 413 इतके विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 21 हजार 608 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत धुळे जिल्ह्याचा 92.29 टक्के निकाल लागला आहे.
जिल्ह्यात 23 हजार 638 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 23 हजार 413 विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी 21 हजार 608 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यात बारा हजार 104 मुली तर नऊ हजार 504 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90.68 टक्के मुले तर 94.42 टक्के मुली जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वाधिक शिरपूर तालुक्याचा 95.70 टक्के निकाल लागला आहे. धुळे तालुक्याचा 89.95 टक्के, साक्री तालुक्याचा 93.34 टक्के, शिंदखेडा तालुक्याचा 90.72, धुळे शहराचा 92.39 टक्के इतका लागला आहे.
पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल 55.71 टक्के लागला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेतील 97.24 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून 84.42 टक्के उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचे 95.31 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमचे 86.31 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.