Sunday, October 6, 2024
Homeनाशिककळवण उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

कळवण उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण

मानूर । वार्ताहर Manur

- Advertisement -

आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या सी.टी.स्कॅन मशीनचा फायदा होणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे बाल रुग्णालय व डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनस्तरावर अंतिम टप्प्यात असल्याचे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन सुविधाचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माणिक देवरे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी, डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत पवार, डॉ. परिमल सावंत,कपिल देशमुख, शशिकांत बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले की, सीटी स्कॅन सुविधा कार्यान्वित करण्यासाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरू होता. अखेर ही सुविधा कार्यान्वित झाल्याने याचा फायदा कळवणसह शेजारील तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे.कळवण उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर प्रस्तावित असून ते लवकरात लवकर सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. शंभर खाटांचे बाल रुग्णालयाचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर केला असून अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात बाल रुग्णालय, डायलेसिस सेंटर सुरु करण्यात येईल असे आश्वासन आमदार नितीन पवार यांनी यावेळी दिले.

डॉ.परिमल सावंत,राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. अनंत पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राकेश हिरे यांनी केले तर आभार प्रकाश आहेर यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. पंकज जाधव, प्रशासकीय अधिकारी कोकणी, प्रतिभा पाटील, मुख्य अधीसेविका वामोरकर, धीरज टाक, अमित धारक, अक्षय भुते आदींसह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या