Friday, May 31, 2024
Homeनाशिकहिवरे येथे विकासकामांचे आज उद्घाटन

हिवरे येथे विकासकामांचे आज उद्घाटन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

हिवरे ( Hivre )येथे आज गुरुवारी सकाळी 8 वाजता आ. माणिकराव कोकाटे ( MLA Manikrao Kokate ) व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे-वानखेडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या समारंभास उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, वनपरीक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, माजी उपसभापती मारुती बिन्नर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे उपस्थित राहणार आहेत.

रस्ता, विहिरीचे उद्घाटन

हिवरे ग्रामपंचायतीचे नूतनीकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प, रस्ते काँक्रिटीकरण तसेच लिंबाची वाडी येथे विहीर बांधकाम आदी कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सुरेखा रूपवते, उपसरपंच मच्छिंद्र सहाणे, ग्रामसेवक किशोर विभूते यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या