Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाजिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट( The New Education Institute),नाशिक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन यांच्या जयंंतीनिमित्त सहाव्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे ( District Level Kho-Kho Competition)उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन फटाक्यांच्या आतषबाजीने व आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले.सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष व संस्थेचे गव्हर्निग कौन्सिल सदस्य रविंद्र कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भास्कर कवीश्वर यांनी सत्कार केला.

- Advertisement -

याप्रसंगी कुमारी हिमांशी ओतारी या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली क्रीडा ज्योतीचे आगमन मैदानावर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.त्यात सानिया शेख, स्नेहा दाणी, स्नेहा भरीत,मेघना पाटील, भक्ती आव्हाड सहभागी झाले होते.तसेच खो-खो खेळाडू कुमार सचिन शिंदे या विद्यार्थ्यांने उपस्थित सर्व खेळाडूंना शपथ दिली.सुत्रसंचालन अनिल सानप यांनी तर आभारप्रदर्शन अनिल ठाकरे यांनी केले.

याप्रसंगी उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, हेमंत बरकले, सरला तायडे, रोहित वैशंपायन, रमेश महाशब्दे,दिनेश जाधव,अमृता कवीश्वर ,कैलास बागुल, भारती चंद्रात्रे, दिलीप निकम, भास्कर कवीश्वर, बाळासाहेब बैरागी, विलास देवरे, शीतल लिंगायत, अमिता भट, मीनाक्षी दौंड , साहेबराव जाधव, सुरेखा कमोद, मीना वाळूंजे, वासंती पेठे, सुभाष महाजन, सुनंदा वाघ, अनुराधा बस्ते, शंकर सोनवणेे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या