Sunday, September 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला...

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाले…

पुणे | Pune

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे आज मेट्रो मार्गाचे लोकार्पण व पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले. यावेळी उपस्थितांशी लाईव्ह संवाद साधताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पुण्यातील (Pune) माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार. दोन दिवसांपूर्वी मला पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण करण्यासाठी यायचे होते. मात्र पावसामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. त्यात माझे नुकसान झाले. पुणे शहराच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यामध्ये येताना ऊर्जा मिळते. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. ही धरती महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे,” असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : “अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला…”; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली खळबळजनक ऑडिओ क्लीप

पुढे ते म्हणाले की, “स्वारगेट मार्गावर मेट्रो धावायला लागेल. सावित्रीबाई यांचे स्मारक याचे सुद्धा आज भूमिपूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना फळ मिळाले आहे, कारण सोलापूर विमानतळ कार्यरत होत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता लोकं थेट सोलापूरला विमानाने जाऊ शकतात. महाराष्ट्र राज्याला नवीन ध्येय ठेवण्याची गरज आहे. आज पुणे ज्या वेगाने वाढते आहे त्यात पुण्याची लोकसंख्या वाढतेय या लोकसंख्याच सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे. महायुतीची सरकार हाच विचार घेऊन दिवस रात्र काम करत आहे”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

हे देखील वाचा : राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख

तसेच पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती पण दुर्दैवी आहे की शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा आभाव राहिला. कुठल्या ही योजना आल्या तर फाईल अडकून राहिल्या याच नुकसान पुण्याला सुद्धा झाले. पुण्यात मेट्रो बनवण्याचे २००८ मध्ये ठरले होते, पण २०१६ मध्ये आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने तर मेट्रोचा एक पिलर बांधले नाही. डबल इंजिन सरकार आधी अनेक प्रकल्पांना उशीर झाला होता. आता एक लक्ष ठेऊन पुढे जायचे आहे, विकसित महाराष्ट्र (Maharashtra) विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार, असे यावेळी मोदी म्हणाले.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्टच सांगितलं

महिलांच्या बाबत दुजाभाव

आमच्या सरकारने (Government) मेट्रोचा पुण्यात सर्वत्र विस्तार केला. विकासाप्रमाणे महिलांच्या बाबतही मागील सरकारचा दुजाभाव होता, असा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदलले, जुनी व्यवस्था बदलली. आम्ही स्वच्छ भारत योजना आणली. महिलांना त्याचा फायदा झाला. शाळेत शौचालये आणली गेली, त्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी झाले. आम्ही आर्मी स्कूलच नव्हे तर सैन्यात अनेक पदावर महिलांना घेतले, आम्ही अनेक कायदे आणले. नारी शक्ती कायदा आणला, महिलांच्या नेतृत्वाची गॅरंटी दिली आहे. आपल्या मुलींसाठी सर्व क्षेत्राचे दरवाजे उघडतील, तेव्हाच देशाच्या विकासाचे दरवाजे उघडतील, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशकात आगमन

असे आहेत मार्गानुसार तिकीटाचे दर

१) जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ – १० रुपये

२) जिल्हा न्यायालय ते मंडई – १५ रुपये

३) जिल्हा न्यायालय ते स्वारगेट – १५ रुपये

४) स्वारगेट ते मंडई – १० रुपये

५) स्वारगेट ते कसबा पेठ – १५ रुपये

६) स्वारगेट ते जिल्हा न्यायालय – १५ रुपये

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या