Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारजांभुळ प्रक्रिया उद्योगाचे ना.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

जांभुळ प्रक्रिया उद्योगाचे ना.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागसंघातर्फे सुरू करण्यात आलेल्या जांभूळ प्रक्रीया (स्ट्रीप) उद्योगाचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.

जांभूळ स्ट्रीप उद्योगाच्या माध्यमातून प्रभागसंघाच्या महिलांसाठी उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासोबत जांभूळ फळाची साठवणूक करणार्‍या महिला व शेतकर्‍यांना कच्च्या मालाची योग्य किंमत मिळवून देणे शक्य होणार आहे.

जांभूळ फळ साठवणूक करणारे, फळ विक्रेते, गाव वनउपज संरक्षण समिती, जांभूळ फळावर प्रक्रीया करणारे आदी संबंधित घटकांची क्षमता बांधणीदेखील या माध्यमातून होणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागसंघांतर्गत १९ ग्रामसंघातील २१ गावांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. एकूण ३ हजार ६७५ कुटुंबे आणि ३५० स्वयंसहायता समूहांचा यात समावेश आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत ६ लाख ६० हजार तर प्रभागसंघाची गुतवणूक ३ लाख ४० हजार असे एकूण १० लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या