Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमबनावट औषधी विक्री केल्याप्रकरणी दोन दुकानांवर कारवाई

बनावट औषधी विक्री केल्याप्रकरणी दोन दुकानांवर कारवाई

नंदुरबार | प्रतिनिधी

बनावट औषधी विक्री केल्याप्रकरणी नंदुरबार शहरातील कृषि सेवा केंद्राच्या दोन दुकान चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७२ हजार ९७५ रुपयांची बनावट औषधी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिातीनुसार, दि.२५ जून रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील एकनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानात दोन खाकी रंगाचे खोके त्यात इसाबियन १, सिंगेंटा कंपनीचे एकुण २० नग सिलबंद बनावट बॉटल आढळून आले.

- Advertisement -

त्यांनी बनावट औषध विक्री करीता ठेवुन कंपनीची प्रतीमा मलीन करुन शासनाच्या महसुलाचे तसेच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान केले. याबाबत सतिष तानाजी पिसाळ (रा.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक येथील साई ऍग्रो इंन्डस्ट्रीजचे मालक (रा. रो हाऊस क्र.१ भाव संगम सोसायटी हिरावाडी पंचवटी नाशिक), चेतन बारकु माळी (वय २३ रा. प्लॉट क्र. ६२ जगतापवाडी नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ४१ हजार ७०० रुपयेे किमतीचे बनावट औषध आढळून आले. पुढील तपास सपोनि नंदा पाटील करीत आहेत.

३१ हजार २३२ रुपयांचे औषध जप्त
नंदुरबार शहरातील संत आसारामजी कृषी सेवा केंद्र या दुकानात ३१ हजार २३२ रुपयांचे बनावट औषध आढळून आले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२५ जून रोजी ४ वाजेच्या सुमारास नाशिक येथील साई ऍग्रो इंन्डस्ट्रीजचे मालक जितेंद्र शेवाळे रा. रो. हाऊस न.१ नाशिक, भाव संगम सोसायटी हिरावाडी पंचवटी नाशिक, रविंद्र रमेश पाटील (वय- ४३ रा. गांधी नगर नंदुरबार) यांनी इसाबियन १, सिंगेंटा कंपनीचे बनावट औषध विक्री करीता ठेवुन सिंगेंटा कंपनीची प्रतीमा मलीन करुन शासनाच्या महसुलाचे तसेच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान केले आहे.

त्यांच्याकडे ३१ हजार २३२ रुपये किमतीचे बनावट औषध आढळून आले. याबाबत प्रविण सुभाष वाघ (रा.मु.पो.वनसगाव ता.निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि चंद्रकांत पाटील करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...