नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
आपल्याला जे मिळालेले आहे ते चांगले करून दाखवावे व लोकांच्या नजरे मध्ये आपल्या बद्दल प्रेम व आदरभाव वाटावा अशी आपली कृती असणे महत्वाचे आहे असे मत पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
सिंहस्थ नगर येथे आमदार सिमा हिरे यांच्या निधीतून व माजी नगरसेविका कावेरी घुगे व गोविंद घुगे यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र संत शक्तीधाम देवस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘वारकरी भवन’ इमारतीचे लोकार्पण ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी बोलतांना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या कि, कलियुगात नामस्मरण केले तरी ईश्वर प्राप्ती होते असे आपल्या संतांनी सांगितले आहे. त्यामागे काय कारण असेल तर मला असे वाटते कि ज्या जिभेवर सतत ईश्वराचे नाव येते त्यात चुकीच्या गोष्टी कमी येतात. कानावर चांगल्या गोष्टी पडल्या तर विचारही चांगले येतात आचरणात येतात श्रद्धेने माणूस नम्र होतो, चांगल्या कामात मन रमवले कि आपल्याला समाधान मिळते.
यावेळी बोलतांना आमदार सिमा हिरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कि,वारकरी भावनामुळे अध्यात्मिक शिक्षण याठिकाणी मिळणार असून एकात्मतेचा संदेश येथून जाणार आहे. पुढील काळात याठिकाणी अजून सुविधा देण्यासाठी मार्च मधे येणार्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही येवेळी आ. हिरे यांनी दिली. वारकरीभवनाच्या माध्यमातून आपण वारकरी परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू या व समाजाच्या कल्याणासाठी कार्य करू या असेही आ. हिरे पुढे म्हणाल्या.
यावेळी यावेळी व्यासपीठावर स्वामी अमृतानंद जोशी बाबा,भाजप नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, भाजप नेते महेश हिरे, स्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे, माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे, प्रतिभा पवार, छाया देवांग,माजी नगरसेवक राकेश दोंदे, पुष्पा आव्हाड, रोहिणी नायडू, माजी नगरसेवक श्याम बडोदे, भगवान दोंदे,रवींद्र पाटील,अविनाश पाटील,भगवान काकड,एकनाथ नवले,परमानंद पाटील आदींसह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.