Friday, May 3, 2024
Homeनाशिकवाहन उद्योगांद्वारे जीएसटी महसुलात वाढ

वाहन उद्योगांद्वारे जीएसटी महसुलात वाढ

सातपूर । प्रतिनिधी Satpur

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने शासनाने उद्योग व्यापाराला सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली होती. यामुळे जीएसटीचे उत्पन्न वाढले आहे. मात्र यात सर्वाधिक वाटा हा वाहन उद्योगाचा ठरला.

- Advertisement -

राज्यात उद्योग व्यापाराला गती देण्याच्या दृष्टीने लॉकडाउन नंतरच्या काळात विशेष प्रोत्साहन योजना लागू करण्यात आल्या होत्या. या योजनांच्या माध्यमातून शासनाच्या महसुलात वाढ होणे अपेक्षित होते. साधारणतः जीएसटी भरणार्‍या व्यवसायांमध्ये वाहन उद्योगाने कमालीची मुसंडी मारत चाळीस टक्क्यांची जीएसटी कर भरण्यातील वाढ नोंदवली आहे.

त्या खालोखाल इलेक्ट्रॉनिक उपकरण त्यातही प्रामुख्याने मोबाईल व त्या संबंधित सेवा यंत्रणा क्षेत्राने 30 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. सोबतच कृषी क्षेत्राने वाढ केली असली तरी थेट जीएसटीची संबंध येत नसल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र अन्न प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून या क्षेत्रातही चांगले काम झालेले आहे. इतर क्षेत्रातून मात्र सुमार दर्जाचे काम आहे. त्यामुळे आपोआपच त्यांच्या जीएसटीवर फारसा प्रभाव दिसून आलेला नाही.

एकीकडे जीएसटी भरण्यातून दिसत असलेल्या करवाढीचा आलेख आपण पाहत आहोत. त्याच वेळी जुन्या वाहनांना ही मागणी दिसून आली होती. मात्र या क्षेत्रात वाहनांचे दर वाढलेले दिसून येतात. प्रत्यक्षात जुन्या वाहनांची विक्री फारशी वाढ झाली नसली तरी वाहनांची संख्या मात्र वाढल्याचे चित्र आहे. बीएस-6 यंत्रणा असलेली नवीन वाहने बाजारात आलेली असल्याने बी एस 4 यंत्रणा असलेल्या जुन्या वाहन बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत.

त्यामुळे वाहनांना फारशी मागणी वाढली नसली तरी बाजारपेठेत मात्र चौकशीसाठी चैतन्य दिसून आले होते. वाहन उद्योगांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची सोबतच शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग यंत्रणा व शेती कामासाठी लागणार्‍या अवजारांची उत्पादन क्षेत्रांना विशेष मागणी असल्याचे जीएसटीच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या