Tuesday, November 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई :

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला असून,मूळ वेतनावरील असणा-या महागाई भत्त्याचा दर 12 टक्क्यांवरून 17 टक्के करण्यात आला आहे. आज वाढविण्यात आलेला 5 टक्के महागाई भत्ता वाढ 1 डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पूर्णकालिन कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा विचार राज्य सरकारचा होता. त्यानुसार राज्य शासकीय कर्माचा-यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.यापूर्वी शासकीय कर्मचा-यांना 12 टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येत होता.

आता त्यामध्ये 5 टक्क्यांनी वाढ केल्याने आता तो 17 टक्क्यांवर गेला आहे.त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.सदर महागाई भत्ता वाढ 1 डिसेंबर 2019 पासून रोखीने देण्यात येईल.तसेच 1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश जारी करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या