Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नंदुरबार| प्रतिनिधी – nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात चोरी घटनांमध्ये दररोज वाढ होत असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी चार मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे. तर नंदुरबार शहरात घरफोडी १ लाख ५१ हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील होळ शिवारातील वर्धामाननगर येथे राहणार्‍या अनिता पंडीत पवार यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी आत प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले १ लाख ५१ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व एक ऍन्ड्रॉईलमोबाईल लंपास केला.

याप्रकरणी अनिता पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत.

तर निझर तालुक्यातील पिंपळोद येथे श्रीधरभाई शंकरभाई पटेल यांची १५ हजाराची मोटरसायकल अज्ञात चोरटयांनी शिंदे गावातील शिवारात असलेल्या शेतातून अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी श्रीधरभाई पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ मोरे करीत आहेत.

शहादा तालुक्यातील तीन मोटरसायकली लंपास

शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील आझाद नगरमध्ये राहणार्‍या प्रफुल्ल संजय डोडवे यांची १५ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एस.१७२४) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वसंत नागमल करीत आहेत.

तर शहादा तालुक्यातील धांद्रे येथे प्रदीप गोपाळराव पाटील यांच्या राहत्या घराच्या अंगणातून १५ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एस.७२९६) लंपास केली. याप्रकरणी प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ काळुराम चौरे करीत आहेत.

तालुक्यातील असलोद येथे राहणार्‍या दिपक युवराज पाटील यांच्या अंगणातून १५ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (जी.जे.०५-जी.एल. ६२७०) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी दिपक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रामा वळवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या