Friday, May 3, 2024
HomeUncategorizedशिष्यवृत्तीसाठी ओबीसी उत्पन्न मर्यादा वाढवा

शिष्यवृत्तीसाठी ओबीसी उत्पन्न मर्यादा वाढवा

मुंबई / प्रतिनिधी

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाख करण्याची मागणी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकारने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत २०१८-१९ पासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून दीड लाख केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून बहुजन कल्याण मंत्रालयाने ही मर्यादा दीड लाख करण्याच्या बाबतीत यावर निर्णय न घेतल्याने ओबीसी विद्यार्थी वाढीव उत्पन्नाच्या लाभापासून वंचित राहत आहेत, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले आहे.

याच कालावधीत केंद्राने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०१८-१९ पासून पालकांची उत्पन्न मर्यादा दोन लाखावरून अडीच लाखापर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली. यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला. मात्र ओबीसी मंत्रालयाने या संदर्भात कोणताच निर्णय न घेतल्याने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने बहुजन कल्याण मंत्रालयाने यात त्वरित पुढाकार घेवून ओबीसी उत्पन्न मर्यादा अडीच लाखापर्यंत वाढवून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणाची विनंती नितीन राऊत यांनी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या