Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवाढते अतिक्रमण वाहतूक कोंडीला कारण

वाढते अतिक्रमण वाहतूक कोंडीला कारण

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नवीन नाशिक ( New Nashik ) परिसराचा दिवसेंदिवस विकास होत आहे. त्यासोबतच मुख्य बाजारपेठांमध्ये अतिक्रमण ( encroachment ) मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याचा परिणाम म्हणून वाहतूककोंडीचा ( traffic congestion ) सामना नवीन नाशिककरांना करावा लागत आहे.

- Advertisement -

नवीन नाशिक परिसरामध्ये प्रामुख्याने त्रिमूर्ती चौक, ( Trimurti Chowk )पवन नगर( Pavan Navar ), उपेंद्र नगर( Upendra Nagar ), शिवाजी चौक शॉपिंग सेंटर ( Shivaji Chowk Shopping Cennter ) आदी प्रमुख भाजी मार्केट परिसर आहेत. या ठिकाणी नवीन नाशिकसह, इंदिरानगर, पाथर्डी फाटा आदी परिसरातून नागरिक भाजी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात.

पवन नगर हा भाग मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हजारो नागरिक दररोज बाजार खरेदीसाठी येतात. मुख्य चौकातच भाजी बाजार व इतर व्यवसाय असल्याने याच ठिकाणी ग्राहकांना वाहने उभी करावी लागतात. कुणीही रस्त्यात कुठेही वाहने उभी करतात. त्यामुळे जाणार्‍या येणार्‍यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. पवन नगर येथे भाजी बाजारासाठी प्रशासनाच्या वतीने गाळे उभारले गेले. त्यानंतर सर्वच नागरिक येथे खरेदीसाठी येऊ लागले.

नवीन नाशकातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पवन नगर उदयास आले. असे असताना वाहने पार्किंगसाठी योग्य नियोजन नसल्याने ग्राहक, नागरिक, वाहनचालक यांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. या ठिकाणी कुणीही कुठेही कसेही वाहने लावतात. अनेक व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. तर अनेक व्यावसायिक हातगाडे थेट रस्त्यावर उभे राहत असल्याने बेशिस्त पणात वाढच होत आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यासोबतच शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे रस्त्यावरच सकाळच्या वेळी भाजीबाजार भरतो. येथे नाशिकच्या आजूबाजूच्या खेडेगावातून शेतकरी थेट भाजी विक्री करण्यासाठी येत असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होतो. त्यामुळे नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदी करण्याकरता गर्दी करतात. यासोबतच या ठिकाणी इतरही व्यवसाय आहेत तर बरेच व्यवसायिक हे रस्त्यावरच अतिक्रमण करून व्यवसाय करताना दिसून येतात. त्रिमूर्ती चौकातील भाजीबाजाराची परिस्थितीपण सारखीच आहे. त्रिमूर्ती चौकातील शाळेबाहेर मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीबाजार भरत असल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या