Friday, May 3, 2024
Homeनाशिकजत्रा चौफुलीवर वाहतुक कोंडीत अतिक्रमणाची भर

जत्रा चौफुलीवर वाहतुक कोंडीत अतिक्रमणाची भर

नाशिक । Nashik

शहरातील पंचवटी विभागात आडगांव शिवारात महामार्गालगत असलेल्या जत्रा हॉटेल भागात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडवरुन वाहतुक सुरू असतांना रस्त्यालगत अतिक्रमण करुन अनाधिकृत हातगाड्या लावत वाहतुक कोंडीत भर टाकली जात आहे.

- Advertisement -

याठिकाणी नागरिकांना जीव मुठीत मार्गाक्रमण करावे लागत असल्याने या भागातील अनाधिकृत हातगाडे तात्काळ न हटविल्यास शिवसेना पंचवटी विभागाच्यावतीने रास्ता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आडगांव प्रभाग 2 मधील हॉटेल जत्राजवळ महामार्गालगत चायनिज, अंडारोल व पावभाजी यासह अनेक अनाधिकृत हातभाडे रस्त्यालगत लावण्यात आल्यामुळे याभागातील वाहतुक कोंडीत भर पडत आहे.

याठिकाणी अनेक महिन्यापासुन के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते जत्रा हॉटेल या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असुन बहुतांशी भागात सर्व्हिस रोडने वाहतुक वळविण्यात आली असुन मुख्य रस्त्यावर कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहतुक कोंडी निर्माण होत असतांना देखील याच रस्त्यालगत राजकिय आशिर्वादाने अनाधिकृत हातगाड्या

- Advertisment -

ताज्या बातम्या