Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs AUS 4th T20 : भारताची मालिकेत २-१ ने विजयी आघाडी;...

IND vs AUS 4th T20 : भारताची मालिकेत २-१ ने विजयी आघाडी; ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव

नवी दिल्ली | New Delhi

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात आज (गुरुवारी)गोल्ड कोस्ट येथील करारा ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ४८ धावांनी पराभूत करून ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघाला सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलने ५६ धावांची भागीदारी रचून आक्रमक सुरूवात करून दिली.

- Advertisement -

अभिषेक शर्माने ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने शुभमन गिलसोबत ३२ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले.शिवम दुबे २२ धावा काढून माघारी परतला.त्यानंतर सूर्यकुमार यादवने शुभमन गिलसोबत ३३ धावांची भागीदारी रचली आणि संघांची धावसंख्या १२१ पर्यंत पोहोचवली. शुभमन गिल ४६ धावा काढून बाद झाला. यानंतर लगेचच सूर्यकुमार यादव २०, तिलक वर्मा ५ आणि जितेश शर्मा ३ धावा काढून तंबूत परतले. वाॅशिंगटन सुंदर ७ चेंडूत १२ आणि अक्षर पटेलने ११ चेंडूत २१ धावांची खेळी साकारली आणि भारतीय संघाला २० षटकांत ८ बाद १६७ पर्यंत मजल मारून दिली.

YouTube video player

भारतीय संघाकडून (Team India) सूर्यकुमार यादव २०, अक्षर पटेल २१ आणि शुभमन गिलने ४६ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून अॅडम झम्पा आणि नॅथन एलिस ने ३-३ तसेच मार्कस स्ट्रॉईनीस आणि झेवियर बार्टलेट ने १-१ गडी बाद केला.धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात देखील चांगली झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि मिचेल मार्शने पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलने मॅथ्यू शॉर्टला २५ धावांवर पायचित केलेआणि भारतीय संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

दुसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्शने जाॅश इंग्लिशसोबत ३० धावा जोडल्या आणि संघाचा डाव सावरला. पण अक्षर पटेलने जाॅश इंग्लिशला १२ धावांवर त्रिफळाचित केलेआणि ही जोडी फोडली. काही वेळातच मिचेल मार्शला शिवम दुबेने अर्शदिपसिंगकडे ३० धावांवर झेलबाद केले. त्यानंतर टीम डेव्हिडने जाॅश फिलीपेसोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादवकडे झेलबाद केले चौथ्या विकेटसाठी दोघांनी २१ धावांची भागीदारी रचली. पण शिवम दुबेने टीम डेव्हिडला सूर्यकुमार यादवकडे १४ धावांवर झेलबाद केले आणि त्याला पॅवेलियनचा रस्ता दाखवला.

मार्कस स्ट्रॉईनीसची साथ देण्यासाठी मैदानावर आलेला जाॅश फिलीपे १० धावा काढून स्वस्तात माघारी परतला.अर्शदिपसिंगने त्याला वरूण चक्रवर्तीकडे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेट गमावली. त्यानंतर लगेचच वरूण चक्रवर्तीने ग्लेन मॅक्सवेलला २ धावांवर त्रिफळाचित करत संघाला सहावा धक्का दिला. वरूण चक्रवर्तीने ग्लेन मॅक्सवेल टी २० क्रिकेट सामन्यात सहाव्यांदा बाद केले. मार्कस स्ट्रॉईनीस १७ ,बेन डाॅरशियस ५ झेवियर बार्टलेट ०,अॅडम झम्पा ० वर बाद झाले. ऑस्ट्रेलिया संघाला १८.२ षटकांत सर्वबाद ११९ धावा काढता आल्या. वाॅशिंगटन सुंदरने टी २० सामन्यात आपले ५० बळी पूर्ण केले. तसेच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाची दुसरी निचांकी धावसंख्या ठरली. भारतीय संघाकडून वाॅशिंगटन सुंदरने ३, अक्षर पटेलने २, वरूण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराहने १-१ गडी बाद केला.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...