Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाIND vs AUS 5th Test : रिषभ पंतचे अर्धशतक; भारताच्या दुसऱ्या डावात...

IND vs AUS 5th Test : रिषभ पंतचे अर्धशतक; भारताच्या दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा

सामना रंगतदार स्थितीत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) पाचवी कसोटी (Test) सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाने (Team India) १४५ धावांची आघाडी घेतली असून सिडनी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या ९-१ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र भारतीय संघाच्या सर्व गोलंदाजांनी अचुक टप्प्यावर मारा करताना ठराविक अंतराने गडी बाद करून ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला डाव १८१ धावांवर रोखला आणि भारतीय संघाला ४ धावांची आघाडी मिळाली.ऑस्ट्रेलिया संघाकडून युवा अष्टपैलू ब्यू वेब्स्टर ५७, स्टीव्ह स्मीथ ३३,सॅम काॅन्टांस २३ ॲलेक्स केरी २१ धावा केल्या. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध्द कृष्णा ने ३-३ गडी बाद केले.नितीश रेड्डी आणि जसप्रीत बुमराहने २-२ गडी बाद केले.

पहिल्या डावात (First Innings) ४ धावांची आघाडी संपादन करणाऱ्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल ही जोडी मैदानावर उतरली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने ६ बाद १४१ धावा केल्या असून, पहिल्या डावात १४५ धावांची आघाडी घेतली आहे.दुसऱ्या डावात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ३२ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकार ठोकत ६१ धावांची खेळी साकारली.

तसेच यशस्वी जयस्वाल २२,शुभमन गील आणि के एल राहुलने प्रत्येकी १३-१३ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून स्कॉट बोलंडने ४ तसेच पॅट कमिन्स आणि ब्यू वेब्स्टर ने १-१ गडी बाद केले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा ८ आणि वाॅशिंगटन सुंदर ६ धावांवर नाबाद राहिले.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...