मुंबई | Mumbai
भारत आणि इंग्लंड (India vs England 3rd T20) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा टी २० सामना आज (दि. २८) रोजी राजकोटमधील निरंजन शाह मैदानावर खेळविण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार असून भारताने (India) सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. लिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडच्या संघाला विजय अनिवार्य असणार आहे.
भारतीय संघाची धुरा सुर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) तर इंग्लंडची जॉस बटलरकडे (Jos Buttler) असणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने राजकोटच्या मैदानावर एकूण ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. मात्र १ सामना गमवावा लागला आहे. तर २०२० पासून भारतीय संघाने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. विशेष म्हणजे इंग्लड संघ या मैदानावर (Ground) प्रथमच सामना खेळणार आहे.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमनदीप सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
जॉस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिलिप सॉल्ट, मार्क वूड.