Saturday, January 24, 2026
Homeक्रीडाInd Vs Eng Test: के एल राहुलचे शानदार शतक; लॉर्ड्सच्या मैदानावर अशी...

Ind Vs Eng Test: के एल राहुलचे शानदार शतक; लॉर्ड्सच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात लोकेश राहुलने आश्वासक खेळी करताना विक्रमी शतक ठोकले आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात त्याच्या बॅटमधून आलेले हे सलग दुसरे विक्रमी शतक ठरले. सध्या तो चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी सुरु झाल्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी मैदानात उतरली. जैस्वाल लवकर बाद झाला. त्यानंतर करुण नायर पाठोपाठ शुभमन गिलची विकेट पडली. एका बाजूने विकेट्स पडत असताना केएल राहुल टिकून खेळला.

आज (१२ जुलै) लॉर्ड्स कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. काल (११ जुलै) इंग्लंडचा संघ ३८७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारतीय सलामी जोडी मैदानात उतरली. दिवसाअखेरीस भारताने १४५ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल (१३ धावा), करुण नायर (४० धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (१६ धावा) अशा प्रकारे ३ विकेट्स पडल्या. त्यानंतर केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी खेळ सावरला.

- Advertisement -

ऋषभ पंतसोबत संयमी भागिदारी
राहुलने संयमी खेळी करत इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजांवर नियंत्रण राखले. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर 53 धावांवर नाबाद असलेल्या सलामीवीर के एल राहुलने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले. त्याने उपकर्णधार ऋषभ पंतसोबत साकारलेल्या भागिदारीमुळे भारताचा डावही सावरला गेला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 141 धावांची भागिदारी केली.

YouTube video player

के एल राहुल इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानात एका पेक्षा अधिक शतक झळकवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. १७७ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने त्याने इंग्लंडच्या मैदानातील चौथे अन् कसोटी कारकिर्दीतील १० शतक साजरे केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...