दिल्ली । Delhi
यंदा १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारत ७८ वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला, तेव्हापासून दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. मी पुन्हा एकदा तुम्हाला, विशेषत: सशस्त्र दलातील आपल्या शूर जवानांना, जे आपला जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करतात, त्यांना शुभेच्छा देते, अशी सोशल मीडिया पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलीय. त्यांनी देशातील नागरिकांना जवानांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद! माझ्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली. लाल किल्ल्यावरील भाषणादरम्याम पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. ‘ नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.