Thursday, November 21, 2024
Homeनगरस्वातंत्र्यदिनी पुणतांबा ग्रामस्थांचे 'रेल्वे रोको' आंदोलन! महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

स्वातंत्र्यदिनी पुणतांबा ग्रामस्थांचे ‘रेल्वे रोको’ आंदोलन! महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

पुणतांबा । वार्ताहर

पुणतांबा (Puntamba Railway Station) रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी पुणतांबा ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असून पुणतांबा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

पुणतांबा रेल्वेस्थानकावर सर्व गाडयांना थांबा मिळावा म्हणून पुणतांबा ग्रामस्थांनी आज (१५ ऑगस्ट) रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्टेशनकडे भव्य रॅलीने प्रंचड प्रयाण केले. ह्या आंदोलनात महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून “अभी नहीं तो कभी नहीं” या घोषणेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले असून रेल्वे अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या बहुतेकांच्या हातात तिरंगे झेंडे आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर ठरलेल्या नियोजनानुसार ग्रामस्थ स्टेशन रोडवरून स्टेशनकडे निघाले आहेत. काल सायकांळी दौंड तसेच मनमाड येथील रेल्वे पोलीसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही आंदोलना निमित्त रेल्वेने मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान मनमाड दौड रेल्वे मार्गावरील ‘पुणतांबा’ हे रेल्वे स्थानक इंग्रज काळापासून महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुर्वी शिर्डीला येण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जायचा. कालांतरानं पुणतांबा ते शिर्डी असा रेल्वे मार्ग टाकल्यानं हे स्थानक जंक्शन झाले. कोविड काळापूर्वी येथे पँसेजर आणि काही मेल गाड्याही थांबत होत्या. मात्र, कोविड काळात बंद केलेला रेल्वे थांबा कोविड निर्बंध उठल्यानंतरही तसाच सुरु राहिल्यानं पुणतांब्याहुन रेल्वे मार्ग बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या