Thursday, January 8, 2026
HomeUncategorizedअपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर हल्लेखोरांकडून गोळीबार

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर हल्लेखोरांकडून गोळीबार


बोदवड | प्रतिनिधी |
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आपल्या प्रचार ताफ्यासह राजुर गावाजवळ पोहोचल्यानंतर, त्यांच्यावर मोटरसायकलवर आलेल्या तीन हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. मात्र या प्रकारामुळे बोदवड तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठीचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी सिद्धेश्वर हनुमान शिरसाळा येथून आशीर्वाद घेतल्यानंतर, कार्यकर्त्यांसोबत बोदवड तालुक्यात प्रचाराला प्रारंभ केला. दरम्यान पावणेतीन वाजे दरम्यान बोदवड मलकापूर रस्त्यावरील राजूर गावाजवळ नांदगाव फाट्याकडून आलेल्या हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला.

- Advertisement -

हल्लेखोरांची संख्या तीन होती. तथा तिघेही मोटरसायकलवर स्वार होते. त्यातील सर्वात शेवटी बसलेल्या हल्लेखोराने मोटरसायकलवर उभे राहून गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यासंदर्भात बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) म्हटले की, केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक समीकरणे, आरक्षणाचे गणित आणि राजकीय वारसा यांचीही चर्चा...