Friday, November 22, 2024
Homeक्रीडाParis Olympic 2024 : भारताला मोठा धक्का! पी.व्ही. सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमधून एक्झिट

Paris Olympic 2024 : भारताला मोठा धक्का! पी.व्ही. सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमधून एक्झिट

पॅरिस । Paris

ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) च्या सहाव्या दिवशी, एकीकडे नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला तिसरे पदक मिळवून दिले, तर दुसरीकडे देशाची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची ऑलिम्पिकमधील पदकांची हॅट्रिक हुकली आणि तिचा पॅरिस ऑलिम्पिक २०४ मधील प्रवास समाप्त झाला आहे.

- Advertisement -

पी.व्ही.सिंधूला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तिला चीनच्या हि बिंग जिओकडून २१-१९ आणि २१-१४ ने पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या गेममध्ये बिंग जिआओने आघाडी घेतली. तिने पीव्ही सिंधूला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही.

हे हि वाचा : दोन कुटुंबातील वाद बेतला जीवावर! महिलेचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

बिंग जिआओ १० गुणांच्या जवळ असताना पीव्ही सिंधू संघर्ष करताना दिसून येत होती. मात्र पीव्ही सिंधूने दमदार कमबॅक केलं आणि बरोबरी साधली. मात्र डावखुऱ्या हाताच्या बिंग जिआओने सिंधूच्या बॉडीलाईनवर अटॅक करणं सुरु ठेवलं. मात्र हा गेम सिंधूला २१-१९ ने गमवावा लागला.

दरम्यान याआधी पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये रौप्य पदक आणि टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला तिसऱ्या पदकाची आशा होती. मात्र, ती असे करण्यात अपयशी ठरली. जर सिंधू हे करण्यात यशस्वी ठरली असती, तर ती तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरली असती.

हे हि वाचा : नेमबाज स्वप्नील कुसाळेला पारितोषिक जाहीर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या