Monday, May 27, 2024
Homeनगरभारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर सट्टा घेणार्‍याला पकडले

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर सट्टा घेणार्‍याला पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटींग (सट्टा) घेणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पटवर्धन चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख व मोबाईल असा 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशाल अश्विनकुमार आनंद (वय 27 रा. पटवर्धन चौक, नगर) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

विशाल आनंद हा पटवर्धन चौक येथील राहते घराजवळ काही इसमांसोबत सध्या चालू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन बेटींग (सट्टा) खेळत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके, रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी पटवर्धन चौक गाठून खात्री केली असता मोबाईलचे स्क्रिनवर भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सामना सुरू होता व दोन ते तीन इसम गोलाकार बसून मोबाईल फोनवर बोलताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहुल लागताच दोन इसम पळून गेले व एका इसमास ताब्यात घेतले. त्याचे नाव विशाल अश्विनकुमार आनंद असे असून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या