इंदोर |Indore
भारतीय संघाने दुसर्या वनडा सामन्यात दणदणीत विजय साकारला आणि त्याचबरोबर ही मालिकाही जिंकली आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारतोन ऑस्ट्रेलिययापुढे 400 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर 33 षटकांत 317 धावांचे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार ठेवण्यात आले होते. पण या आव्हानाचा यशस्वी पाठलाग ऑस्ट्रेलियाला करता आला नाही आणि भारताने विजयासह या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत असताना भारताने यावेळी ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा जोरदर रंगत होती. पण भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी भारताने फलंदाजी तर दमदार कामगिरी केली, पण त्याचबरोबर गोलंदाजीतही त्यांनी छाप पाडली. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु झाला आणि त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाची 9 षटकांत 2 बाद 56 अशी स्थिती होती तेव्हा पाऊस पडला आणि जवळपास दीड तासाचा खेळ वाया गेला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत विजयासाठी 317 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पावसानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांचा डाव चांगलाच गडगडल्याचे पाहायला मिळाले. रवींचद्रन अश्विनने त्यानंतर तीन बळी मिळवले, तर दोन बळी मिळवत रवींद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या फिरकी गोलंदाजीचे वर्चस्व यावेळ पाहायला मिळाले आणि त्यामुळेच त्यांना हा सामना मोठ्या फरकाने जिंकता आला. भारताने 399 धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नवीन इतिहास रचला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाने 400 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या 383 धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये बंगळुरूमध्ये केली होती.
दुसरीकडे त्याचवेळी, एकूण वन डेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या 418/5आहे, जी त्यांनी डिसेंबर 2011 मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदोरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतासाठी शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतके, तर के एल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली.