Thursday, May 22, 2025
Homeदेश विदेशभारतात टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी

भारतात टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी

नवी दिल्ली – भारताने चीनवर थेट डिजिटल स्ट्राईक केला आहे. मोदी सरकारनं टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

- Advertisement -

दरम्यान भारत-चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी अ‍ॅप रडारवर होते. चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाच्या संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असलेल्या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी 52 धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात केंद्र सरकारला एक अहवाल पाठवला होता. त्यात चिनी अ‍ॅप सुरक्षेच्या दृष्टीनं धोकायदायक असल्याचं म्हटलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशार्‍यानंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता.

भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवलेला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते, असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.

बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपची यादी –

1. TikTok, 2. Shareit, 3. Kwai, 4. UC Browser, 5. Baidu map,

6. Shein, 7. Clash of Kings , 8. DU battery saver, 9. Helo

10. Likee, 11. YouCam makeup, 12. Mi Community, 13. CM Browers

14. Virus Cleaner, 15. APUS Browser, 16. ROMWE, 17. Club Factory,

18. Newsdog, 19. Beutry Plus, 20. WeChat, 21. UC News, 22. QQ Mail,

23. Weibo, 24. Xender, 25. QQ Music, 26. QQ Newsfeed, 27. Bigo Live,

28. SelfieCity, 29. Mail Master, 30. Parallel Space , 31. Mi Video Call – Xiaomi, 32. WeSync, 33. ES File Explorer, 34. Viva Video – QU Video Inc,

35. Meitu, 36. Vigo Video, 37. New Video Status, 38. DU Recorder,

39. Vault- Hide, 40. Cache Cleaner DU App studio, 41. DU Cleaner,

42. DU Browser, 43. Hago Play With New Friends, 44. Cam Scanner,

45. Clean Master – Cheetah Mobile, 46. Wonder Camera, 47. Photo Wonder, 48. QQ Player, 49. We Meet, 50. Sweet Selfie, 51. Baidu Translate,

52. Vmate, 53. QQ International, 54. QQ Security Center, 55. QQ Launcher,

56. U Video, 57. V fly Status Video, 58. Mobile Legends, 59. DU Privacy

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी नाशिक दौर्‍यावर

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (दि.२४) नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत असून, येथील विभागीय आयुक्तालय नाशिक येथे दुपारी २.३० वाजता नागरिकांच्या अडचणी...