Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशKhalistan Row : कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियमावली जाहीर

Khalistan Row : कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना ५ दिवसात देश सोडण्याचे आदेश भारताने दिले आहेत. यापार्श्वभूमीवर कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी तिथल्या भारतीयांना देश सोडण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली जारी केली आहे. कॅनडात राहणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना तेथील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि हिंसाचार पाहता अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक कॅनडाला जाणार आहेत त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत अशा ठिकाणी आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

याच दरम्यान, ट्रूडो सरकारने कॅनडाच्या नागरिकांसाठी एक ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली असून भारताच्या काही राज्य फिरण्यासाठी असुरक्षित असल्याचे सांगत त्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. कॅनडाणे जारी केलेल्या नव्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या ठिकाणी दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. या यादीत केंद्र शासित प्रदेश लडाखचा समावेश नाही. जम्मू काश्मीर सोबत कॅनडाच्या नागरिकांनी भारताच्या इशान्येकडील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन केले आहे. या सोबतच पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा समावेश असून पाकिस्तान सीमेपासून १० किमी भागात न जाण्याचा सल्ला देखील दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या