Saturday, May 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia Pakistan War : पाकिस्तानचे भारताविरोधात सोशल मीडियावर खोटे दावे; कर्नल कुरेशींकडून...

India Pakistan War : पाकिस्तानचे भारताविरोधात सोशल मीडियावर खोटे दावे; कर्नल कुरेशींकडून पत्रकार परिषदेत फोटो दाखवत पोलखोल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानकडून (Pakistan) सतत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात अनेक गावातील घरांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या तणावादरम्यान सलग चौथ्या दिवशी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्याची आणि खोट्या दाव्याची माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी कुरेशी म्हणाल्या की,”पाकिस्तानी सैन्याने (Pakistani Army) पश्चिमी सीमेवर हल्ले केले आहेत. भारतीय सैन्य तळांना टार्गेट करण्याचा पाकने प्रयत्न केला. एलओसीवर सातत्याने गोळीबार (Firing) केला जात आहे. श्रीनगरपासून अनेक ठिकाणांवरून हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने उत्तर दिले. उधमपूर, भटिंडासारख्या ठिकाणी उपकरणांना नुकसान पोहचवले. पंजाबच्या एअरपेसवर मिसाईड डागण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांना टार्गेट केले. भारतीय सैन्यानेही पाकचे हल्ले (Attack) परतावून लावले. पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत असल्याने भारतीय सैन्याने संयमाने प्रत्युत्तर दिले आहे असे त्यांनी म्हटले.

पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोटे दावे शेअर

पाकिस्तानने चुकीच्या माहितीचा आधार घेत आदमपूर येथील एस-४०० प्रणाली, सूरतगड, नगरोडा येथील ब्रह्मोस बेस, देहरागिनी तोफखाना, चंडीगढमधील दारूगोळा नष्ट करण्याचे खोटे दावे सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पसरवले. मात्र भारत हा फेक नरेटिव्ह पूर्णपणे नाकारतो आहे, असे सोफिया म्हणाल्या. भारतीय एअरफोर्सला नुकसान पोहचवल्याचा पाकचा दावा खोटा आहे. यावेळी सिरसा, सूरत एअरबेसचे व्हिडिओ, फोटो कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दाखवत याठिकाणी कोणतेही नुकसान झालेले नाही, असे कुरेशी यांनी म्हटले.

भारतीय महिला पायलट पकडल्याचा दावा खोटा – पीआयबी

पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा भारतीय सैन्यदल फोटो आणि व्हिडीओ दाखवून रोज टराटरा फाडत आहे. भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, भारताच्या पीआयबीने (Press Information Bureau) हे वृत्त फेक असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग (Shivani Singh) यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही, असे पीआयबीने म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India vs Pakistan War : भारत-पाक संघर्षात अमेरिकेकडून मध्यस्थीचा प्रस्ताव

0
दिल्ली । Delhi भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक पाठिंबा मिळतो आहे. रशिया आणि जपानने उघडपणे...