Thursday, May 8, 2025
Homeदेश विदेशIndia Pakistan War : भारताचा पाकिस्तानवर Water स्ट्राईक; सलाल आणि बगलीहार धरणाचे...

India Pakistan War : भारताचा पाकिस्तानवर Water स्ट्राईक; सलाल आणि बगलीहार धरणाचे दरवाजे उघडले, पूर येण्याची शक्यता

नवी दिल्ली | New Delhi 

भारताने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर पाकिस्तानची (Pakistan) चांगलीच कोंडी केली आहे. अगोदर सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित करत पाकिस्तानचे पाणी रोखले होते. त्यानुसार चिनाब नदीवर बनलेल्या सलाल आणि बगलीहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, आता भारताने पाकिस्तानला दुहेरी झटका दिला आहे.

- Advertisement -

भारताने चिनाब नदीवर (Chinab River) बांधलेल्या सलाल आणि बागलिहार धरणाचे (Salal and Baglihar Dam) दरवाजे उघडले आहेत. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले असून, त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये (Water Attack on Pakistan) पूरस्थितीत निर्माण होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने रामबन येथील बगलिहार धरणाचा दरवाजा उघडला आहे.भारताने सिंधू जल करार स्थगित केलेला आहे. त्यामुळे आता या धरणांमधून (Dam) किती पाणी सोडायचे हा निर्णय भारताच्या हातात आहे. तसेच भारताने सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी का सोडले याचे कारण सांगितलेले नाही. मात्र, भारताने अचानक पाणी सोडल्याने पाकिस्तानातील लोकांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे पाकिस्तानी नागरिक त्यांच्या सरकारला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा डावा आखला होता. मात्र, भारताच्या सतर्क सैन्याने त्यांचा हा डाव ड्रोनच्या सहाय्याने उधळून लावला आहे. यासंदर्भात विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी कालपासून आजपर्यंत काय घडले याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India Pakistan War : भारताने पाकिस्तानवर काय-काय कारवाई केली? परराष्ट्र मंत्रालयाने...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi  भारताने (India) बुधवार (दि. ७ मे) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानात (Pakistan) घुसून एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये ९ दहशतवादी...