नवी दिल्ली | New Delhi
काल भारतातील (India) १५ शहरांमध्ये पाकिस्तानने (Pakistan) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तानातील १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांमधील एअर डिफेन्स सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
भारत आणि पाकिस्तानातील (India and Pakistan) वाढलेला तणाव बघता अमेरिका, ब्रिटनसह मोठ्या देशांनी भारत आणि पाकिस्तानात फिरायला जाऊ नका, असा सल्ला दिल्ल्याची माहिती आज सकाळीच आली होती. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानातील आपल्या नागरिकांना लाहोर सोडा किंवा जीव वाचवा, असा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने (America) भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात (India Vs Pakistan) जाऊ नका,पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसेच देश सोडण्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा असे आदेश त्यांच्या नागरिकांना दिले आहेत. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आज भारताने पाकिस्तानच्या लष्कराने अणुबॉम्ब (Atomic Bomb) ठेवलेल्या शहरांतही ड्रोन हल्ले (Drone Attack) केले आहेत. त्यातच आता अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.