Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशचीन, पाकवर नजर ठेवण्यासाठी हा मोठा करार

चीन, पाकवर नजर ठेवण्यासाठी हा मोठा करार

नवी दिल्ली

भारताने इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स)Phalcon airborne warning विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली भारताचे आकाशातील नेत्र ठरणार आहे.

- Advertisement -

महागड्या किमतीमुळे दोन वर्षापासून एक अब्ज डॉलरचा हा करार प्रलंबित होता. चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोक्यामुळे भारताने एवॅक्स घेतले.भारताला पुढच्या तीन ते चार वर्षात इस्रायलकडून ही एवॅक्स सिस्टिम मिळेल.इस्रायलीकडून घेण्यात येणारी एवॅक्स रशियन बनावटीच्या इल्यूसीन-७६ विमानावर बसवण्यात येणार आहे. आंतरमंत्रालयीन समितीत Cabinet Committee on Security (CCS) झालेल्या चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी मंजुरी मिळणार आहे.

भारताकडे एवॅक्सची संख्या आता पाच होईल. भारतीय हवाई दल यापुर्वीच तीन सिस्टिम वापरत आहे. दोन नवीन फाल्कन आधीपासून वापरात असलेल्या तीन फाल्कन एवॅक्स सिस्टिमपेक्षा अधिक अत्याधुनिक असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या