Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाIND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज लढत; कुणाचे पारडे जड?

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज लढत; कुणाचे पारडे जड?

वर्ल्डकप फायनलच्या पराभवाची परतफेड करण्याची टीम इंडियाला संधी

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) २०२४ मध्ये आज सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात सामना होणार आहे.उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना विजय संपादन करावा लागणार आहे. गेल्या वर्षी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता.या पराभवाची परतफेड करण्याची संधी आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या रूपाने भारताला चालून आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरु होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : IND vs BAN : उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारतीय संघाने (Team India) यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी केली आहे.संघाने आतापर्यंत ५ सामने खेळले असून सर्व सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी भारत सज्ज असणार आहे. दुसरीकडे साखळी फेरीच्या सामन्यात सर्व ४ सामन्यात विजय संपादन करून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ मध्ये बांगलादेश विरूध्द झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी विजय संपादन करून आपला विजयीरथ कायम राखला होता.मात्, रविवारी अफगाणिस्तान विरुध्द झालेल्या लढतीत २१ धावांनी पराभूत व्हावे लागल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो वा मरो’ असा असणार आहे. तसेच या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे.

हे देखील वाचा : IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३१ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत.यात भारताने १९ तर ऑस्ट्रेलियाने (Australia) ११ सामन्यात बाजी मारली आहे.तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. २०१२ पासून झालेल्या सर्व सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दबदबा राहिला आहे. तसेच टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून भारत ३-२ ने आघाडीवर आहे. दुसरीकडे भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या खेळीची भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे.मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या,यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि सुर्यकुमार यादव फलंदाजीतून चमकदार कामगिरी करत आहेत.तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल फॉर्मात आहेत.

हे देखील वाचा : IND vs USA : भारत-अमेरिका आज भिडणार; पाकिस्तानचा सुपर-८ चा प्रवेश टीम इंडियाच्या हातात

दरम्यान, ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाल्यास मागील काही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेल लयीत परतला आहे. तसेच ट्रेवीस हेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्ट्रोयनीस,मॅथ्यू वेड हे सर्व अनुभवी फलंदाज अफगाणिस्तान विरुध्द अखेरच्या सामन्यात अपयशी ठरले होते.त्यामुळे या सर्व फलंदाजांकडून मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. तर गोलंदाजीत पॅट कमिन्स, एॅडम झम्पा, मार्कस स्ट्रोयनीस, एॅशटरन एगर यासह सर्व गोलंदाज संघाला सातत्याने बळी मिळवून देत आहेत.याशिवाय आजच्या सामन्याच्या दिवशी पावसाची (Rain) शक्यता असल्याचे हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या