Wednesday, October 16, 2024
Homeक्रीडाIND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना; भारताला मालिका...

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना; भारताला मालिका विजयाची संधी

मुंबई | Mumbai

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरू आहे. भारतीय संघाने पहिला सलामीचा सामना जिंकून लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वात १-० ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी आणि लोकेश राहुलच्या कर्णधारपदामधे दुसरी मालिका जिंकण्याची भारताला संधी मिळणार आहे…

- Advertisement -

तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाकडे मालिकेत कमबॅक करण्याची अखेरची संधी असणार आहे. हा इंदोरमधील होळकर मैदानावर (Holkar Maidan in Indore) खेळविण्यात येणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स १८ दुपारी १:३० वाजता करण्यात येणार आहे. या मैदानावर झालेल्या ६ एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ ४ सामन्यात विजयी झाला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला केवळ २ सामन्यात विजय संपादन करता आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

२०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. इंदूरची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असल्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय कर्णधार पसंत करण्याची शक्यता आहे. तर सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. मात्र दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २००६ मध्ये झाला होता. त्यावेळी पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ३०७ आणि दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या २६२ इतकी होती. तसेच या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यातील ४१८-५ इतकी आहे. तर नीचांकी धावसंख्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या सामन्यातील २२५-१० इतकी आहे. तसेच भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग ने २०११ मध्ये या मैदानावर वेस्टइंडिज विरुद्ध २१९ धावांची खेळी केली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Ajit Pawar : “माझं ते काम…”; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisment -

ताज्या बातम्या