पहिल्या कसोटीमध्ये दुखापतग्रस्त शमीच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आज संधी देण्यात आली. भारतीय संघाने दाखवलेल्या विश्वासाला सिराजने सार्थ ठरवले. सिराजच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया संघाच्या मधल्या फळीने गुडघे टेकले. सिराजने महत्वाचे दोन बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली.
पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी पाठवले. गिलने लाबुशेनचा अवघड असा झेल टिपला. लाबुशेनने ४८ धावांची खेळी केली.
- Advertisement -
त्यानंतर कॅमरुन ग्रीनलाही सिराजने माघारी पाठवले. कॅमरुन ग्रीन पायचीत बाद झाला त्याने १२ धावांची खेळी केली.
बुमराहला चार तर अश्विनला तीन गडी बाद करता आले. सिराज ने दोन बळी टिपले तर जडेजालाही अखेरीस एक बळी टिपला. १९५ धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव संपृष्टात आला.