नवी दिल्ली | New Delhi
आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेचा साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचा थरार आटोपला आहे.त्यानंतर आता सुपर ८ सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्यात आज शनिवारी भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात निर्णायक सामना खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात पाकिस्तान,आयर्लंड,अमेरिका संघाविरुद्ध शानदार विजय संपादन केला आहे.तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत ७ गुणांची कमाई करताना अव्वल स्थान निश्चित केले आहे.
हे देखील वाचा : सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळाकडे रवाना
तसेच सुपर ८ मध्ये खेळविण्यात आलेल्या अफगाणिस्तान विरुध्दचा सामना भारतीय संघाने (Team India) जिंकून आपली विजयी लय कायम राखली आहे. यानंतर आता बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी भारत सज्ज असणार आहे. दुसरीकडे बांगलादेशने कर्णधार नजमूल हुसेन शांटोच्या नेतृत्वात नेपाळ,नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय संपादन करून सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला होता. मात्,र ऑस्ट्रेलिया विरूध्द झालेल्या पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेश संघावर स्पर्धेबाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.दोन्ही संघांची तुलना केल्यास भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या हे फलंदाज फॉर्मात आहेत. मात्,चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अद्याप आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.विराट कोहलीने संपूर्ण स्पर्धेमध्ये केवळ २९ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माला आयर्लंड विरूध्द एकमेव अर्धशतक झळकावता आले आहे.तसेच अष्टपैलू खेळाडून रवींद्र जडेजाने फलंदाजीतून निराशा केली आहे.त्यामुळे या सामन्यातून त्याला डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.तर पर्यायी खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वाल किंवा संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा
तसेच गोलंदाजीत अर्शदिप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या या गोलंदाजांनी कमाल केली आहे. तसेच बांगलादेशच्या कामगिरीकडे नजर टाकल्यास नजमूल हुसेन शांटो, तौहीद हिरडॉय वगळता शाकिब आल हसन, लिटन दास, महमदुलला या खेळाडूंना आपल्या फलंदाजीतून मोठी खेळी साकारावी लागणार आहे. तर गोलंदाजीत तनझीद हसन शकीब, मुस्तफिजूर रहेमान, टसकीन अहमद, शाकिब आल हसन,यांनी मागील काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये १३ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत.यात हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. भारतीय संघाने १२ तर बांगलादेशने १ सामना जिंकला आहे. तसेच टी २० वर्ल्डकप स्पर्धेमध्ये ४ सामने खेळविण्यात आले असून सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. भारतीय संघासाठी मागील ७ सामन्यात सुर्यकुमार यादवने २७३ तर रोहित शर्मा शर्माने १९७ धावा केल्या आहेत. तसेच अर्शदिपसिंगने ९ सामन्यात १६ बळी तर मुस्तफिजूर रहेमानने १० सामन्यात २० बळी घेतले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा