Monday, November 25, 2024
Homeक्रीडाIND vs BAN : विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांगलादेश भिडणार; कुणाचे पारडे जड?

IND vs BAN : विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांगलादेश भिडणार; कुणाचे पारडे जड?

पुणे | Pune

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC ODI World Cup) ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला नमवून सलग तीन विजय संपादन करून फॉर्मात असलेल्या भारतीय संघाचा (Indian Team) सामना आज बांगलादेशसोबत (Bangladesh) होणार आहे. हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला चौथा विजय संपादन करण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथे खेळविण्यात येणार आहे…

- Advertisement -

यंदाच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर बांगलादेशचे शाकिब अल हसनकडे (Shakib Al Hasan) आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील १७ वा सामना होणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध सलामी सामन्यात शानदार विजय मिळविल्यानंतर बांगलादेशला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध सलग २ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असणार आहे.

Nashik Vani News : वणी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आयशरसह ६३ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना बेड्या

तसेच आज भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यास आयसीसी विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या सामन्यात नवीन डावपेच आखून मैदानावर उतरण्यासाठी बांगलादेश सज्ज असणार आहे. तर भारतीय संघातील लोकेश राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे आघाडीचे चारही फलंदाज प्रचंड फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे चौथ्या सामन्यात फॉर्म कायम राखण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने ही भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे.

दरम्यान, भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) यांच्यात ४० एकदिवसीय सामने झाले असून यात भारताने ३१ तर बांगलादेशने ८ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. तसेच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४ वेळा हे दोन्ही संघ आमनेसामने आले असून यात भारताने ३ तर बांगलादेश संघाने १ सामन्यात विजय संपादन केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Lalit Patil News : ललित पाटील प्रकरणात दोन महिलांना नाशिकमधून अटक; कोण आहेत या महिला?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या