मुंबई | Mumbai
भारत आणि आयर्लंड (India Vs Ireland) यांच्यात ३ टी २० सामन्यांच्या मालिकेचा (Series) थरार सुरू असून त्यातील सलामीचे दोन्ही सामने जिंकून पाहुण्या भारतीय संघाने (Indian Team) मालिकेत २-० ने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. त्यानंतर आज मालिकेतील तिसरा टी २० सामना होत असून हा सामना जिंकून मालिकेत यश संपादन करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे…
Pradeep Sharma : अँटिलिया स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. तसेच हा सामना यजमान आयर्लंडसाठी मालिकेतील आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप टाळण्याचा आयर्लंडचा इरादा असणार आहे. भारताने दुसरा टी २० सामना जिंकून सलग तिसऱ्यांदा आयर्लंडविरुद्ध मालिका विजय (Series Win) मिळविला आहे.
Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? वाचा सविस्तर
दरम्यान, या मालिकेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र वेस्टइंडिज (West Indies) विरुध्द टी २० मालिकेत सलामीच्या ३ सामन्यात चमकदार कामगिरी करणारा तिलक वर्मा (Tilak Verma) आयर्लंडविरुद्ध सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात वर्मासह इतर खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Sinnar News : शाळकरी मुलीची त्रासाला कंटाळून आत्महत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा