Monday, November 25, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023 : भारत आज नेपाळशी भिडणार; सामन्यावर पावसाचं सावट, भारतासमोर...

Asia Cup 2023 : भारत आज नेपाळशी भिडणार; सामन्यावर पावसाचं सावट, भारतासमोर ‘करो या मरो’ची स्थिती

मुंबई | Mumbai

आज सोमवार (दि.०४) रोजी आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत भारत आणि नेपाळ (India vs Nepal) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरु होणार असून याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आशिया चषकाच्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यामध्ये नेपाळने युएई (UAE) विरुध्द विजय संपादन करुन आशिया चषकाच्या मुख्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला होता. मात्र, सलामी सामन्यात नेपाळला पाकिस्तान विरुद्ध २३८ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता या पराभवातून सावरून नेपाळ भारतीय संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह झाला ‘बाबा’; मुलाचे ठेवले ‘हे’ नाव

भारतीय संघ प्रथमच नेपाळ विरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) तर नेपाळचे कर्णधारपद रोहित पाऊंडेल (Rohit Poundel) सांभाळत आहे. भारत आणि नेपाळसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. कारण सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे.

भारताने पाकिस्तान (Pakistan) विरुध्दच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना त्रिफळाचित करत सामन्यावर मजबूत पकड केली होती. तर दुखापतीवर मात करून भारतीय संघात पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरला हरीस रौफने झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला होता.

Chandrayaan 3 च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला, ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन

यानंतर शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारतीय संघाची अवस्था ४ बाद ६६ अशी बिकट झाली होती. मात्र, ईशान किशन आणि हार्दिक पांडया यांच्या शानदार अर्धशतकांमुळे भारतीय संघाला २६६ धावांपर्यंत मजल मारता आली.पाकिस्तानला विजयासाठी २६७ धावांचे लक्ष देण्यात आले होते. मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हा सामना रद्द करून दोन्ही संघांना १-१ गुण बहाल करण्यात आला.

त्यानंतर आज भारत आणि नेपाळ यांच्यात सामना होत असून आहे. मात्र, याही सामन्यावर पावसाचे सावट असून सामन्याच्या दिवशी ८८ टक्के पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला किंवा भारताने नेपाळचा पराभव केला तर भारत आणि पाकिस्तान सुपर ४ साठी पात्र ठरतील. तसेच नेपाळ विरुध्द भारताला पराभव स्वीकारावा लागला तर नेपाळ आणि पाकिस्तान सुपर ४ मध्ये दाखल होतील.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सलिल परांजपे, नाशिक

Maratha Andolan : “महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर, तो अदृश्य फोन कॉल…”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या