Saturday, May 18, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

इंदूर | Indore

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेत यजमान भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी संपादन केली आहे…

- Advertisement -

मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचा यजमान भारतीय संघाचा प्रयंत्न असणार आहे. यासोबतच भारतीय संघाला आयसीसी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.

तर न्यूझीलंड संघासाठी हा सामना म्हणजे एक औपचारिकता असणार आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवांमुळे न्यूझीलंड संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. इंदूर येथील सामन्यात विजय संपादन करून एकदिवसीय मालिकेत विजयी शेवट करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज असणार आहे.

मात्र तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज मोहंमद सिराज आणि मोहंमद शमी यांना अंतिम ११ मधून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय कुलदीप यादव आणि अष्टपैलू वॉशींग्टन सुंदरलाही अंतिम `११ मधून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाची इंदूरच्या होळकर मैदानावरील कामगिरी शानदार राहिली आहे. भारतीय संघाने या मैदानावर ५ एकदिवसीय सामने खेळले असून, ५ सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे.

भारतीय संघाच्या धर्तीवर पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्याचे पाहुण्या न्यूझीलंड संघाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं आहे. इंदूरच्या मैदानावर झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी २ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत केलं आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या