Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाWomen T20 World Cup : भारत-विंडीज आज आमनेसामने

Women T20 World Cup : भारत-विंडीज आज आमनेसामने

केपटाऊन | Cape town

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेत (ICC T20 World Cup) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने (Indian Womens Team) दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या महिला वर्ल्डकप टी २० स्पर्धेच्या सलामी सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करून विजयी सुरुवात केली आहे…

- Advertisement -

पहिल्या सामन्यातील विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला असून दुसरा सामना आज वेस्ट इंडीज (West Indies) संघाशी होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. सायंकाळी ६ वाजता हा सामना सुरु होणार आहे. तर वेस्टइंडीज संघाला सलामी सामन्यात इंग्लंड संघाने पराभूत केले आहे.

तसेच आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि विंडीज संघाना विजय अनिवार्य असणार आहे. तर भारताची नियमित सलामीवीर स्मृती मंधाना या सामन्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तर आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाने वेस्टइंडीज महिला संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे संघाचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी विंडीज महिला संघ सज्ज झाला आहे.

दरम्यान, महिला आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडीज संघांमध्ये २ सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय संपादन केला आहे. तर आतापर्यंत टी २० सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण २० सामने झाले असून यात भारताने १२ तर वेस्टइंडीज संघाने ८ विजय संपादन केले आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या