Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाउद्यापासून भारत - वेस्टइंडीज वनडे मालिका

उद्यापासून भारत – वेस्टइंडीज वनडे मालिका

मुंबई । Mumbai

इंग्लंडविरुद्धची (England) पाचवी कसोटी (Test) पराभूत झाल्यामुळे निराश झालेल्या भारतीय संघाने (Indian team) इंग्लंडविरुद्ध नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेत्तृत्वात यजमान इंग्लंड संघाचा एकदिवसीय आणि टी २० मालिकेत पराभव केला. त्यानंतर आजपासून भारतीय संघ वेस्टइंडिज संघाशी ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे…

- Advertisement -

भारत आणि वेस्टइंडिज (India & West Indies) मालिकेतील पहिला सामना उद्या सायंकाळी ७ वाजता त्रिनिदादच्या (Trinidad) पोर्ट ऑफ स्पेन क्रिकेट स्टेडियमवर (Port of Spain Cricket Stadium) खेळविण्यात येणार आहे. या मालिकेचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स आणि फॅन कोडवर करण्यात येणार आहे. तर या मालिकेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे स्टार खेळाडू मुकणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाची कमान सलामीवीर डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) असणार आहे. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) उपकर्णधार असेल.

तसेच विंडीज संघाचे नेतृत्व निकोलस पुरणकडे (Nicholas Pooran) देण्यात आले असून शाई होपवर (Shai Hope) उपकर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवनसोबत शुभमन गिल (Shubman Gill) ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) किंवा ईशान किशनला संधी मिळू शकते. तसेच सूर्यकुमार यादव, दीपक हुडा आणि श्रेयस अय्यरवर मधल्या फळीतील फलंदाजी सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे. तर यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन किंवा ईशान किशनवर असणार आहे.

दरम्यान, या सामन्यात गोलंदाजीची भिस्त शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आवेश खान (Avesh Khan) प्रसिद्ध कृष्णा आणि आर्षदिपसिंग यांच्यावर असणार आहे. तर फिरकीची मदार अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि युझवेन्द्र चहलवर असणार आहे.

सलिल परांजपे,नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या