Saturday, May 25, 2024
Homeक्रीडाIND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज दुसरा T20 सामना

IND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज दुसरा T20 सामना

मुंबई | Mumbai

भारत आणि वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यात ५ टी २० सामन्यांची मालिका (Series) सुरू असून पहिल्या सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर आज दुसरा टी २० सामना (T20 Match) होत असून भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे…

- Advertisement -

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; एका जवानासह ६ जणांचा मृत्यू, काही भागात घरांची जाळपोळ

सलामीच्या लढतीत झालेल्या पराभवातून भारतीय संघ (Indian Team) सावरला असून पहिल्या सामन्यातील पराभवाच्या चूका सुधारून मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्याची संधी मिळणार आहे. तर वेस्ट इंडिजला मालिकेतील आपली विजयी आघाडी अधिक भक्कम करण्याची संधी असणार आहे. विशेष म्हणजे गयाना येथील मैदानावर (Guyana Ground) खेळविला जाणारा आजचा १२ वा टी २० आंतरराष्ट्रीय सामना असून भारतीय संघ या मैदानावर दुसरा टी २० सामना खेळणार आहे.

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

दरम्यान, भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय संपादन केला होता. तसेच या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १२३ इतकी असून प्रथम फलंदाजी करणारा संघ ३ तर धावांचा पाठलाग करणारा संघ ५ सामन्यात विजयी (Victory) झाला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चंद्राच्या कक्षेत पोहोचताच Chandrayaan-3 चा अनोखा संदेश, “मी चंद्राचे…”

- Advertisment -

ताज्या बातम्या