नवी दिल्ली | New Delhi
भारताचा पहिला सराव सामना हा इंग्लंडबरोबर होणार होता. पण हा सामना पावसामुळे एकही षटक न टाकता रद्द करावा लागला. आता भारताचा दुसरा सराव सामना मंगळवारी होणार आहे. पण हा दुसरा सराव सामना कोणत्या संघाबरोबर आणि कुठे होणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे.
भारताचा हा दुसरा सराव सामान जो आहे तो ३ ऑक्टोबरला तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. भारताचा हा सामना नेदरलँड्च्या संघाबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ नेमके कोणते प्रयोग करतो, हे पाहणे सर्वात महत्वाचे असेल.
वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापूर्वी भारताचा हा अखेरचा सामना असेल. कारण यानंतर भारतीय संघ थेट वर्ल्ड कपमध्येच उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारताला प्रयोग करता येतील. त्यामुळे भारतासाठी हा सामान सर्वात महत्वाचा असेल. कारण भारताला अजून चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला खेळवायचे हे ठरवता आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात हा प्रयोग नक्कीच करून बघितला जाऊ शकतो.
सध्याच्या घडीला भारतात पावसाचे वातावरण आहे आणि या सामन्याच्यावेळी पाऊस पडू शकतो, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांची भूमिका महत्वाची असेल. कारण जेव्हा पाऊस पडते तोव्हा वेगववान गोलंदाजांना चांगली मदत मिळत असते. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.