मुंबई | Mumbai
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू फुलराणी म्हणून ओळख असलेली आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप विभक्त होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. दोघांचेही डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले. सायना हिने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
भारतीय क्रिडा क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडूंमध्ये घटस्फोटांची मालिकाच सुरु आहे. मागील काही वर्षात हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांसारखे स्टार खेळाडू आधीच त्यांच्या जोडीदारांपासून वेगळे झाले आहेत. आता बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या ‘ब्रेक अप’ पोस्टने सर्वांना धक्का दिला आहे. सायनाने तिचा पती आणि बॅडमिंटनपट्टू पारुपल्ली कश्यपसोबत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.
ऑलम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने रविवारी १३ जुलै रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली शेअर केली. ज्यात तिने म्हंटेल आहे की, दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे नाते फक्त सात वर्षेच टिकले. 35 वर्षांच्या सायनाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून पतीसोबत वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला.
सायनाने पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
सायना आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. खूप विचारविनिमय केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत. स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी, आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे. यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” सध्या सायनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सायना आणि कश्यप यांचे ७ वर्षांपासून लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून लपवून ठेवले होते. दोघांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती.
सायना नेहवालने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर २०१५ मध्ये सायनाने वर्ल्ड बॅडमिंटन क्रमवारीत पहिले स्थान पटकावून इतिहास रचला आणि जगातील नंबर वन शटलर बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, पी. कश्यपने २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




