नाशिक | प्रतिनिधी | Nashik
साधारण चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा (Nashik Municipal Corporaion Election) निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर झाला आणि शहराच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे चित्र स्पष्ट झाले. १२२ पैकी तब्बल ७२ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सन २०१७ च्या तुलनेत भाजपचे संख्याबळ वाढले असले तरी यंदा राजकीय समीकरणे मात्र पूर्णपणे वेगळी होती. २०१७ मध्ये भाजपकडे ६६ जागा होत्या, यंदा हा आकडा ७२ वर गेला आहे म्हणजेच भाजपने सहा जागांची निव्वळ बाढ नोंदवली. मात्र त्यावेळी एकसंध असलेली शिवसेना ३५ जागांसह प्रमुख विरोधी पक्ष होती. बंदा शिवसेनेची फूट झाल्याने चित्र बदलले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २६ जागा मिळवत दूसरे स्थान पटकावले, तर उद्धव ठाकरे गटाला १५ जागांवर समायान मानावे लागले. एकत्रित पाहिले तर शिवसेनेचे पारंपरिक बळ कमी झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी सहा जागा होत्या, यंदा अजित पवार गटाला केवळ पाच जागा आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. म्हणजेच दोन्ही पक्षांची ताकद घटली आहे. मनसे २०१७ मध्ये पाच जागांवर होती, यंदा केवळ एक जागेवर आली आहे. अपक्षांचे संख्याबळही बारावरून एकवर आले आहे. मतदानाची टक्केवारी २०१७ च्या सुमारे ६२ टक्क्यांवरून यंदा साधारण ५७ टक्क्यांवर घसरली, तरी भाजपला स्पष्ट बहमत मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंहस्थमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकवर (Nashik) केंद्रित केलेले लक्ष, पक्षांतरांची रणनीती आणि संघटनात्मक ताकद वाचा फायदा भाजपला (BJP) झाला. एकूणच यंदाचा निकाल हा केवळ सत्ता राखण्याचा नव्हे, तर बदललेल्या राजकीय समीकरणांचा स्पष्ट आरसा दिसत आहे.
भाजपचा स्ट्राईक रेट ८४.९६ टक्के
मनपा निवडणुकीत भाजपने एकूण ११८ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ७२ जागांवर विजय मिळवला यावरून भाजपचा स्ट्राईक रेट ८४.९६ टक्के ठरला आहे, जो पक्षाच्या मजबूत संघटनात्मक बांधणी आणि प्रभावी निवडणूक रणनीतीचे द्योतक मानला जात आहे.
मनसेचा स्ट्राईक रेट ३.४५ टक्के
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र निकालात पक्षाला मोठा धक्का बसला. २९ पैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला, त्यामुळे मनसेचा स्ट्राईक रेट अच्या ३.४५ टके राहिला. प्रभाग क्र. १३ मधून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पत्नी मयुरी पवार या एकमेव विजयी ठरल्या विशेष म्हणजे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सलीम शेख यांच्यासह अनेक बड्या चेहन्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१२ ते २०१७ पर्यंत ४० नगरसेवकांच्या जोरावर मनपात मनसेवी सत्ता होतील, तर २०१७साली मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते.
आप, एमआयएम शून्य
एमआयएम, आम आदमी पाटी, समाजवादी पार्टी तसेच रिपब्लिकन सेना या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. प्रचारात हे पक्ष सक्रिय दिसत असले तरी प्रत्यक्ष मतदानात त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. परिणामी या चारही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. स्थानिक राजकारणात माय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न यंदा निष्फळ ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर
रा.काँ. (श.प.) ने खातेही उघडले नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले होते. यापैकी एकही उमेदवाराला विजय प्राप्त करता आला नाही. पदाधिकाऱ्यांच्या मते वरिष्ठ नेत्यांनी कुठल्याही प्रकारच्या सभा किंवा रोड शो केला नाही. यामुळे उमेदवाराला कुठलीही मदत प्राप्त झाली नाही.
काँग्रेस ७.६६ टक्के
काँग्रेसने २३ जागा लढवत तीन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसचा ७.६६ इतका स्ट्राईक रेट राहिला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचाराच्या वेळी फिरकले देखील नाही. तरी देखील काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला आहे.
शिवसेना २६ टक्के
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवली. १०१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले, मात्र निकालानंतर केवळ २६ उमेदवार विजयी होऊ शकले. मागील मनपामध्ये शिवसेनेचा आकडा ३५ होता. तोसुद्धा गाठता आला नाही.
शिवसेना (उबाठा) १२ टक्के
उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईसह राज्यात निवडणुका लढवल्या. नाशिकमध्ये ८० जागांवर उमेदवार उभे केले. मात्र मतदारांनी केवळ १५ उमेदवार विजयी केले. पक्षाकडे केवळ पाच नगरसेवक उरले होते त्याचे १५ झाले एवढे समाधान पक्षश्रेष्ठी व्यक्त करत आहेत.




